संलग्नता नुतनीकरण मान्यता प्रक्रिया १ महिन्यांची मुदत वाढ

सन २०२५-२०२८ या प्रशिक्षण सत्रापासून संलग्नता नुतनीकरण मान्यता प्रक्रिया राबविण्याचे कार्यक्रम वेळापत्रक सर्व जिल्हा व्यवसाय शिक्षण व                                              प्रशिक्षण अधिकारी कार्यालयामार्फत २०२२-२५ या प्रशिक्षण सत्रात संलग्नता नुतनीकरण मान्यता प्राप्त संस्थाना निर्गमित करण्यात आले आहेत.

सदर कार्यक्रम वेळापत्रकानुसार संबंधित सर्व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाकडे दिनांक ३१/३/२०२५ पर्यंत प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावयाचे होते. तथापि बऱ्याच संस्थांकडून जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाकडे अजून पर्यंत प्रस्ताव सादर करण्यात आलेले नाहीत, असे निदर्शनास आले आहे तसेच जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयांमार्फत मंडळाकडे दिनांक ३०/४/२०२५ पर्यंत प्रस्ताव सादर होणे आवश्यक आहे. वरील बाबींचा विचार करुन अर्ज सादर करण्याच्या दिनांकास १ महिन्यांची मुदत वाढ देण्यात येत आहे.

यानंतर मंडळाकडून कोणत्याही सबबीवर नुतनीकरणासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची सर्व संबंधित संलग्नित संस्थांनी नोंद घ्यावी.