जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय कार्यालयांतर्गत लोकशाही दिन आयोजनाबाबत

जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी कार्यालय,
छत्रपती संभाजीनगर

क्रमांक:
दिनांक: ११.०४.२०२५

विषय: जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी कार्यालय कार्यालयांतर्गत लोकशाही दिन आयोजनाबाबत

संदर्भाधीन विषयानुसार, DVETO कार्यालयास संलग्नित संस्थांद्वारे विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रदर्शन कार्यक्रम राबवले जातात. या प्रदर्शन कार्यक्रमांदरम्यान संस्थांना, प्रशिक्षकांना व विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पुढील सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत:

१. ऑनलाइन सुविधा:

  • वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे (FAQs)
  • तक्रार निवारण प्रणाली
  • हेल्पलाइन सेवा

२. प्रशासनिक मदत:

  •  जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी कार्यालय,
  • तसेच प्रादेशिक कार्यालयांमार्फत देखील अडचणी सोडवण्यात येतात.

३. तथापि, वरील सर्व पर्यायांचा अवलंब केल्यानंतरही लाभार्थ्यांच्या अडचणी न सुटल्यास महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ कार्यालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक महिन्याच्या चौथ्या गुरुवारी खालीलप्रमाणे लोकशाही दिन आयोजित केला जाणार आहे:

  • व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे: सकाळी १०.०० ते ११.००
  • प्रत्यक्ष उपस्थितीद्वारे: सकाळी ११.०० ते दुपारी १२.००

४. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठीची लिंक जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

५. लोकशाही दिन व्यतिरिक्त, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी कार्यालयास भेट देण्याची वेळ पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे:

  • सकाळी ११.०० ते दुपारी १२.००
  • दुपारी ०३.०० ते ०४.००

सूचना:
सर्व लाभार्थ्यांना विनंती करण्यात येते की DVETO कार्यालयास प्रत्यक्ष भेट देण्यापूर्वी ऑनलाइन प्रणालीद्वारे उपलब्ध असलेल्या सुविधांचा प्रथम वापर करावा, जेणेकरून प्रत्यक्ष भेटीची आवश्यकता भासणार नाही.

(अभिजित अरविंद आलटे)
जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी (DVETO)
छत्रपती संभाजीनगर